। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्याला लाभलेल्या कर्तव्यदक्ष तहसीलदार कविता जाधव या आपल्या चांगल्या कार्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. तर नुकतीच त्यांनी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणार्या विठ्ठलवाडी-राजखलाटी विभागातील कांदळे या गावी सदिच्छा भेट देऊन तेथील युवा शेतकरीवर्गाचे तोंडभरून कौतूक केले.
तहसीलदार कविता जाधव यांनी नुकतीच कांदळे येथील शेतीच्या बांधावर थेट भेट देऊन येथील दुर्गम भागात पाण्याची वाणवा असताना युवा शेतकरी वर्गाने कलिंगड व अन्य भाजीपाल्याची पिके जोमदारपणे पिकविल्याने सर्व युवा शेतकरी व अन्य शेतकरी वर्गाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी त्यांनी तरुणांनी शेती क्षेत्राकडे अधिक लक्ष द्यावे याबाबत वैचारिक चर्चा झाली.तसेच शेतीची आधुनिक पद्धत व यांत्रिकरणाचा वापर याबाबत महत्त्व पटून दिले. तर येथील युवा शेतकरी प्रमोद पार्टे आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई येथे वास्तव्यास आहेत. परंतू गावच्या मातीशी जुळलेले नाळ हे कधीही न विसरणारे असल्याने 2-3 महिन्याच्या सुट्टीत गावाकडे आले व फावल्या वेळेत काय करायचे याच विचार करून कलिंगड शेतीकडे लक्ष वळून शेतीमध्ये दिवस-रात्र मेहनत मेहनत करून कलिंगड शेतीमध्ये अक्षरशः त्यांनी नंदनवन फुलविले असल्याचे पाहताच तहसीलदार कविता जाधव यांनी त्यांचे तोंडभरून कौतूक केले.