बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा

| मुंबई | प्रतिनिधी |

बंड्या मारूती सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवी वर्ष आणि मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून अखिल भारतीय पुरुष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे दि. 28 एप्रिल ते 02 मे 2026 या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत भारतातील नामवंत संघानी आपला सहभाग नोंदविला आहे.

महाराष्ट्रातील सात बलाढ्य संघ भारताच्या विविध राज्यातून आलेल्या आठ संघाशी चूरशीची लढत देतील. मंगळावारी (दि.28) एप्रिल रोजी युवा पलटन (इनशोअरकोट प्रा. लिमि.) विरुद्ध मिडलाईन अकॅडमी या सामन्याने या कबड्डीच्या महासंग्रामाला सुरुवात होईल. मॅटच्या एका क्रीडागणावर सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात हे सामने खेळविले जातील. बी. के. फौंडेशन व महर्षी दयानंद स्पोर्टस्‌‍ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च 2010 रोजी काळाचौकी येथे अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा झाली होती. त्यानंतर 16 वर्षानी मुंबईत या स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेत बारा लाख बारा हजार(1212000-) रुपयांची रोख रक्कम बक्षीसा दाखल वाटण्यात येईल.

स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघास रोख रु. पाच लाख(500000) व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघास रोख रु. तीन लाख(300000) व आकर्षक चषक प्रदान करण्यात येईल. उपांत्य उपविजयी दोन्ही संघाना प्रत्येकी रोख रु. पन्नास हजार व चषक प्रदान करण्यात येईल. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूस रोख रु. एक लाख(100000), तर स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीच्या खेळाडूस प्रत्येकी रोख रु. पन्नास हजार(50000) देऊन गौरविण्यात येईल. प्रत्येक सामन्यात उत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूस रोख रु. पाच हजार(5000) देऊन सन्मानित करण्यात येईल. ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम नसून कबड्डीच्या परंपरेला, खेळाडूंच्या जिद्दीला आणि मराठमोळ्या अस्मितेला अभिवादान करणारा एक भव्य सोहळा ठरणार आहे. देशभरातील अव्व्ल प्रो-कबड्डी स्टार या संघातून खेळणार असल्याने प्रत्येक सामन्यात थरार, कौशल्य आणि उत्तम रणनीतीचा उत्कृष्ट संगम पहावयास मिळणार आहे.

संघांची विभागणी
1) अ गट :- 1)युवा पलटन(इनशोअरकोट प्रा. लिमि.), 2) ओ. एन. जी. सी., 3)मिडलाईन अकॅडमी.
2) ब गट :- 1)भारत पेट्रोलियम, 2) दक्षिण मध्य रेल्वे, 3) मुंबई पोस्टल.
3) क गट :- 1) भारतीय नौदल, 2) मुंबई बंदर, 3) तामील थलाईवास.
4) ड गट :- 1) रेड आर्मी, 2)युनियन बँक, जयपूर पिंक क्लब.
5) ई गट :- 1) तामिळनाडू स्टेट, 2) यु. पी. योद्धा, 3)डी. पी. यु. पुणे.
Exit mobile version