कबड्डीपट्टू नारायण वाळंज यांचे निधन

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
कबड्डीला श्‍वास व प्राण मानणारा कुहीरे गावचा राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू नारायण वाळंज यांचे वयाच्या 53 व्या वर्षी दि.(01) रोजी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मित निधनाने कबड्डीच्या बादशहाची एक्झिट झाली असून क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. जय भवानी क्रीडा मंडळ कुहीरेचा अत्यंत बहाद्दर व उत्कृष्ट खेळाडू तसेच प्रसिद्ध चढाईपट्टू, राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांचे नावलौकिक होते. कबड्डी स्पर्धेतून जिल्ह्यासह, राज्य व देशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळतात या जाणिवेतून भरविण्यात आलेल्या विविध कबड्डी स्पर्धेच्या आयोजनात त्यांचा विशेष सहभाग असायचा.

वाळंज यांनी तब्बल 40 वर्षे खेळाच्या कलेतून आपले नाव क्रीडा प्रेमीच्या मनात गाजवले. त्याचे कलेच्या माध्यमातून ते नेहमीच क्रीड़ा रसिकांच्या हृदयात कायम आठवणींनी राहतील हे निच्छित.त्यांच्या निधनाने कुहीरे गावासह पेण तालुका व जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे. दशक्रिया विधी दि.10 जून 2022, उत्तरकार्य 13 जून रोजी कुहीरे येथील राहत्या घरी होणार आहे.

Exit mobile version