| सुतारवाडी | वार्ताहर |
रा.जि.प. प्राथमिक शाळा वाळंजवाडी येथे केद्र तिसे अंतर्गत फेब्रुवारी 2024 ची शैक्षणिक शिक्षण परिषद केंद्रप्रमुख म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
प्रारंभी केंद्रप्रमुख म्हात्रे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर रा.जि.प. शाळा वाळंजवाडी येथील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत पद्य गायन केले. सर्व उपस्थितांचे स्वागत कापसे यांनी केले. म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. तद्नंतर शैक्षणिक चर्चा विषयांत शाळा ढोकळे वाडी विज्ञान दिन साजरा करणे, शाळा म्हसकर वाडी कला क्रीडा कापसे यांनी खेळाद्वारे प्रात्यक्षिक दाखवून विजेता स्पर्धकांना बक्षिसे दिली व प्रत्यक्ष सहभाग घेतला. महाडिक यांनी अभ्यासपूर्वक चर्चा घडवून सर्वांचा सहभाग घेतला. सर्व विषयांवर म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना आपण शाळेत अशाप्रकारे उपक्रम राबविणे आवश्यक असून, त्यासाठी जास्तीत जास्त पुस्तके वाचन करून घेऊन विद्यार्थ्यांना सवय लावली पाहिजे व त्यांचे ज्ञान समृद्ध केले पाहिजे, असे सांगितले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुप्रिया वाळंज, सदस्य नवनिता वाळंज, अमोल कदम, मारूती वाळंज, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रद्धा बिरगावले यांनी केले. संजय पवार यांनी आभार प्रदर्शन केले.