। मुंबई । प्रतिनिधी ।
बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई व महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लबची राष्ट्रीय खेळाडू पुष्पा महाडेश्वर (रोडे) यांचे (दि.11) सायंकाळच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. निधना समयी त्या 62 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुली असा परिवार आहे. काही वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. कबड्डी खेळाडू म्हणून महाराष्ट्र बँक व महर्षी दयानंद संघाकडून खेळताना त्यांनी महाराष्ट्रातील व देशातील अनेक मैदाने गाजविली होती. आजारपणामुळे त्यांनी बँकेतून काही वर्षापूर्वी सेवानिवृत्ती घेतली होती.
त्यांनी तीन राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते. उत्कृष्ट डावा कोपरारक्षक असलल्या पुष्पा चवडा काढण्यात निष्णात होत्या. चढाईत पाठलाग करून गडी टिपण्यात त्यांचा हातखंडा होता. 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर चेंबूरच्या चरई स्मशानभूमीत मुलाच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले.