मुरुड मजगाव नवतरुण मित्रमंडळ आयोजित कबड्डी स्पर्धा

कबड्डी स्पर्धेत खारिकवाड्याचा वादळ संघ विजयी

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील मजगावच्या नवतरुण मित्रमंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत खारीकवाड्याच्या वादळ संघाने अंतिम सामन्यात बाजी मारत ही स्पर्धा जिंकली. त्यांनी खार मजगावच्या श्री बजरंग संघाचा दहा गुणांनी पराभव केला. या दोन्ही संघांना प्रथम व द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. स्पर्धेत तिसरा क्रमांक भैरवनाथ कबड्डी संघ मजगाव व चौथा क्रमांक शिवशंभो वाळवटी संघाला मिळाला.

स्पर्धा पाहण्यासाठी यशवंतनगर पंचक्रोशीतील कबड्डी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकाश सद्रे, मुरूड जंजिरा, रायगड
Exit mobile version