शिवसेना आमदारांची धमकी
। हिंगोली । वार्ताहर ।
शिवसेनेचे हिंगोली येथील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत प्रक्षोभक विधान केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पायाचीही बरोबरी नसलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या बद्दल बोलणे चुकीचे आहे. पोलिस संरक्षण बाजुला केल्यास त्यांच्या घरात घसून त्यांचा कोथळा बाहेर काढण्याची आपली तयारी आहे, असे खुले आव्हान कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आंदोलनाच्या वेळी दिले.