। अलिबाग । प्रतिनिधी ।
माटुंगा सांस्कृतिक केंद्र, दादर-मुंबई येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित संपन्न झालेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2022 सोहळ्यात पेझारी येथील नाट्यदिग्दर्शक अभिनेते राजन पांचाळ यांना राज्यस्तरीय कलारत्न गौरव पुरस्कार 20221ने सन्मानित करण्यात आले आहे.
साहित्यिक रमेश आव्हाड यांच्या समारंभाध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय कीर्तनकार श्यामसुंदर महाराज सोन्नर, सुप्रसिद्ध इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन तथा जगप्रसिद्ध कलाकार डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील 25 क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या 101 मानकर्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला.