| पाली/गोमाशी | वार्ताहर |
शिवशक्ती मित्र मंडळ इंदरदेव धामनसई येथे रायगड जिल्हा धनगर समाज असोसिएशनच्या माध्यमातून भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन शनिवार (24 ) रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत 16 संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत गोकूळवाडा अ आणि मिलगाव ब या दोन संघात झाली. या अटीतटीच्या लढतीत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपला बहारदार खेळ केला.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक गोकुळवाडा अ या संघास रोख रक्कम सात हजार व चषक, द्वितीय क्रमांक मिलगाव ब संघास रोख रक्कम पाच हजार व चषक,तृतीय क्रमांक सोनारशेत संघास रोख रक्कम तीन हजार व चषक,चतुर्थ क्रमाक गौळमाल अ संघास रोख रक्कम तीन हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील मालिकावीर महेश खरात (गोकुळवाडा) तर उत्कृष्ट चढाईदार दर्शन आखाडे (मिलगाव) उत्कृष्ट पक्कड आकाश ढेबे (गोकुळवाडा) या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
धामनसई कबड्डी स्पर्धेत कालभैरव गोकूळवाडा विजयी
