| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील वांदोली ग्रामस्थ व तरूण मंडळाच्यावतीने संपन्न झालेल्या विभागीय कबड्डी स्पर्धेत काळभैरव वांदोली संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ करून विजेतेपदाचा बहुमान पटकावला.
विलास म्हात्रे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जगदीश देशमुख, हेमंत कडव, अशोक कडव, राजाभाई देशमुख, मगर मामा, ग्रामस्थ व कबड्डीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या कबड्डी स्पर्धेत काळभैरव वांदोली संघाने प्रथम क्रमांक व जय भवानी पाले या संघाने द्वितीय क्र. पटकावला. तर भैरवीनाथ यशवंतखार व जय भवानी रेवोली या संघांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई तन्मय खांडेकर पाले, उत्कृष्ट पक्कड हर्ष सुरनकर यशवंतखार, पब्लिक हिरो आशिष काशिद रेवोली, तर मालिकावीर म्हणून अजिंक्य कडव वांदोली यांना तसेच, विजेत्यांना सरपंच हेमंत कडव व अशोक कडव यांच्या तसेच, अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी सर्व चषक व सन्मानचिन्ह कमल नारायण देशमुख यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते जगदीश नारायण देशमुख पुरस्कृत करून सहकार्य केले. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वांदोली ग्रामस्थ व तरूण मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.
काळभैरव वांदोली संघ ठरला विजेता
