। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील मुठवली खु.येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात लांढर संघाने सर्वोत्तम खेळ करीत विजेतेपद पटकावले आहे. रोहा तालुका शिवछत्रपती क्रिकेट असोशियन पिंगळसई-धामणसई व मुठवली विभाग यांच्या वतीने जय भवानी मित्र मंडळ मुठवलीखुर्द यांच्या वतीने संपन्न झालेल्या या सामन्यांचे उद्घाटन महेंद्र पोटफोडे, जयवंत मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत जाणता राजा अ या संघाने उपविजेतेपद पटकावले.तर धामणसई अ व मुठवली ब संघांनी अनुक्रमे तुतीय व चतुर्थ क्र.पटकावले. मालिकावीर म्हणून विवेक शिंदे(लांढर) यांनी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर अविनाश शेळके (मुठवली) तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून रत्नेश मोहिते(पिंगळसई) यांनी पटाकावले.
या विजेत्या संघांना व सर्वोत्तम कामगिरी करणार्या खेळाडूंना अनंत देशमुख, योगेश शिंदे,शिवाजी पाशिलकर, महेश तुपकर, मारूती तुपकर, मंगेश तुपकर, येणाजी शिंदे,वसंत शिंदे, राम सावंत, निलेश शिंदे आदी मान्यवरांचे हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या सामन्यांच्या यशस्वीतेसाठी जय भवानी मुठलली मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.