| कंधार | प्रतिनिधी |
कृषीवल परिवारातर्फे मराठवाड्यात सुरु असलेल्या महिलांच्या हळदीकुंकू सोहळ्याला मंगळवारी (दि.31) कंधार, जि. नांदेड येथे उदंड प्रतिसाद लाभला. या सोहळ्यासाठी जिवाची होतिया काहिली मालिकेतील श्रुतकिर्ती सावंत, गाथा नवनाथमधील मच्छिंद्रची भूमिका करणारे जयेश शेवलकर, आशीर्वाद तुझा आई एकविरा आईमधील मयुरी वाघ आदी कलावंत उपस्थित होते.
बालाजी मंदिर, भवानीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्य महिला आघाडी प्रमुख आशाताई शिंदे, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह रेखाताई राम गोरे, सभापती ज्ञानेश्वर चोंडे, विशाल कौसल्ये, सुनिता जाधव, अवधूत शिंदे, राम गोरे, अशोक सोनकांबळे, अवधूत पेरकर, वसंत मंगनाळे, गिरीष सावकार मामडे, शेखभाई, अशोक बोधगिरे, महेश पिनाटे, बाळू मंगनाळे, ओमराज शिंदे, कृष्णा परोडवार, प्रविण मळनकर, वर्षाताई भोसीकर, शोभाताई नलगे आदी उपस्थित होते.
कृषीवल परिवारातर्फे कृषीवल व्यवस्थापक रुपेश पाटील, डिजिटल आवृत्ती संपादक माधवी सावंत, जाहिरात व्यवस्थापक हर्षा पाटील,मार्केटिंग हेड सचिन गुप्ता आदी सहभागी झालेले होते. यावेळी जंगमवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सर्व महिला सदस्य,मानसपुरी ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने हा हळदीकुंकू सोहळा दिमाखात साजरा केला जात आहे.गेल्याच आठवड्यात रायगडात अलिबाग, पाली आणि खालापूर या ठिकाणी हजारो महिलांच्या उपस्थितीत हळदीकुंकू सोहळा साजरा करण्यात आला आहे.