आज करंजा ग्रामपंचायत निवडणूक

| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी करंजा मच्छिमार सोसायटीची निकडणूक शनिवारी, दि. 24 डिसेंबर रोजी होणारे आहे. करंजा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक दि. 18 डिसेंबर रोजी होणार होती. परंतु, ग्रामपंचायत निवडणूक दि. 18 डिसेंबर रोजी होणार होती. परंतु, मच्छिमार सोसायटीची निवडणूक त्याच दिवशी ठेवण्यात आली होती. त्यामुळे वातावरण दूषित होऊ नये म्हणून दि. 24 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोसायटीचे वार्षिक सुमारे 50 कोटींची उलाढाल असलेल्या संस्थेचे एकूण 3812 मतदार आहेत. 3812 मतदार 17 संचालकांची गुप्त मतदानाने निवड करणार आहेत. यामध्ये दोन महिला संचालकांचा समावेश आहे. दरम्यानच्या काळात उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघार यामध्ये 17 पैकी 8 संचालक पदाच्या जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित नवापाडा, कोंढरीपाडा, कासवले पाडा येथील 9 जागांसाठी 24 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थेचे उपनिबंधक शिरिष सकपाळ यांनी दिली.

Exit mobile version