। नेऱळ । संतोष पेरणे |
कर्जत या मुंबई पासून जवळ असलेल्या तालुक्यात आंबेडकरी चळवळ प्रचंड वेगाने पसरली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार कर्जत तालुक्यातील बौद्ध समाजातील तरुणांनी तात्काळ आत्मसात करून प्रसंगी डॉ बाबासाहेब यांच्यासमवेत धम्माची दीक्षा नागरपूर मध्ये घेताना सोबत दिलेली तरुण या कर्जत तालुक्यातील होते. धर्म वाढविण्याचे काम आंबेडकरी चालवली मधील असंख्य कार्यकर्ते कर्जत तालुक्यात प्रसिद्धीपासून लांब राहून आजही करीत आहेत. भारतीय बौद्ध महासभा मध्ये धर्माचे काम करणारे यांची एक साखळी तयार असून हि परंपरा यापुढे देखील कायम राहील असे कार्य कर्जत तालुक्याच्या 85 गावात गावात अखंडपणे सुरु आहे.
तालुक्यात बौद्ध समाजाची अखंड वस्ती असलेले एकही गाव नाही,पण कर्जत आणि नेरळ चा शहरी भाग वगळता तालुक्यातील 85 गावांमध्ये हा समाज गुण्यागोविंदाने राहत आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर घडले त्या मुंबई महानगरपासून कर्जत तालुका दोन तासांच्या अंतरावर असल्याने कर्जत तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते बाबासाहेबांच्या संपर्कात होते. त्यातील काही तरुणांनी धम्माची दीक्षा घेताना देखील साथ दिली होती अशी उदाहरणे करजत तालुक्यात आहेत. देश स्वतंत्र झाल्यानंतर 1956 मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना झाली आणि त्यात संघटनेत बौद्ध धर्माचे काम करण्यासाठी कर्जत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईतून माहिती घेऊन कर्जत तालुक्यातील 84 गावात पोहचण्याचे काम करणार्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्या काळात आर्थिक दृष्ट्र्या मागासलेल्या आणि अत्यन्त गरीब असलेल्या बौद्ध समाजातील कुटुंबावर एखादे संकट आले कि समाजातील सर्व कार्यकर्ते आपल्यापरीने आर्थिक आणि शारीरिक मदत कार्याला पोहचायचे. त्यामुळे महासभेच्या माध्यमातून सुरु असलेले काम पाहून बौद्ध समाजातील सर्व लोकांमध्ये धर्माचे कार्य करणारी संघटनेबाबत चांगले मत निर्माण होऊ लागले.
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात आंबेडकरी विचार पोहचवण्याबरोबर आंबेडकरी आचरणाप्रमाणे कर्जत तालुक्यात सामाजिक कामे सुरु होती. मात्र हे विचार अधिक लोकांपर्यंत पोहचावे यासाठी कर्जतच्या अभिनव शाळेत युगपुरुष हे नाटक याच कार्यकर्त्यांनी सादर केले आणि गाजवले देखील होते.अशी नाटके आणि कव्वालीच्या माध्यमातून धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला गावोगावी होऊ लागला होता. तालुक्यात त्यावेळी पक्षीय राजकारण नव्हते,मात्र कर्जत तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा गावोगावी मात्र उभारल्या जाऊ लागल्या होत्या.त्यातून धर्माचा प्रसार करतानाच धर्माच्या प्रसारासाठी बौद्ध विहार असायला हवेत अशी मागणी पुढे येऊ लागली आणि आज कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी बौद्ध विहार आणि बौद्ध समाज मंदिरे उभी राहिली आहेत. त्यात कडाव ,डिकसळ,किरवली,नेरळ,गुंडगे,दहिवली,कर्जत बुद्धनगर,कशेळे येथून कार्य सुरु आहे. मात्र तालुक्यात भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक शासनाच्या माध्यमातून उभे राहिलेले नाही हि खंत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली तरी देखील नाही हि खंत अनेकांना आहे.
या समाजाने धर्माने कर्जत तालुक्यातून अनेक गीतकार, गायक, कवी, साहित्यिक जन्माला आले आहेत. त्यांचे सर्वांसाठी प्रेरणादायी असून साहित्यिक लक्ष्मण अभंगे, गायक हिरामण अभंगे, अशोक अभंगे, किसान साळवी, दत्ताजी साळवी तर कवी म्हणून चंद्रकांत पवार,गोपीनाथ ओव्हाळ यांचे कार्य महत्वाचे आहे. या सर्वांच्या कार्याची आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वाटचाली बद्दल साहित्य म्हणून प्रकाशित झालेले नाही ते भविष्यत यायला हवे असे काहींनी मत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने समोर आले आहे.