। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषदेमधील आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून नियुक्त झालेल्या कर्मचार्यांना सेवेत कायम करण्यात आले आहे. तसे नियुक्तीपत्र त्यांना गुरुवारी देण्यात आले आहे. कर्जत नगरपरिषद आस्थापनेवर वारसा हक्काने आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून नियुक्त झालेल्या सात कर्मचारी यांना सेवेचा परिविक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण केल्याने त्यांना सेवेत कायम करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसे नियुक्ती पत्र नगराध्यक्ष सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र गोसावी, आस्थापना विभाग प्रमुख अविनाश पवार, अभियंता मनीष गायकवाड, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, बांधकाम विभागाचे रवींद्र लाड, सभा कामकाज विभाग प्रमुख कल्याणी लोखंडे, कर विभाग रूषिता शिंदे, डी.के. गायकवाड, मुकादम प्रदीप मोरे उपस्थित होते. कुणाल चव्हाण, नम्रता वाघेला, आकाश परदेशी, केतन गायकवाड, हर्षवर्धन कांबळे, परेश गरुडे, पूजा मोरे या सात जणांना सेवेत कायम करण्यात आले आहे.