कर्जत नगरपरिषदेच्या मॅरेथॉनला प्रतिसाद

| कर्जत | वार्ताहर |

कर्जत नगरपरिषदेच्या वतीने शहरामध्ये मॅरेथॉन- 2024 ‘एक धाव आरोग्यासाठी’चे आयोजन केले होते. सहा गटात ही स्पर्धा आयोजित केली होती. या मॅरेथॉनमध्ये सुमारे एक हजार अबालवृद्धांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कर्जत नगरपरिषदेने उत्कर्ष इव्हेंट, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, लाईट ऑफ लाईफ यांच्या सहकार्याने मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन केले होते. कर्जत नगरपरिषद कार्यालयासमोरून ही स्पर्धा सुरू होऊन पुन्हा तेथेच स्पर्धेचा शेवट करण्यात आला.

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक राहुल डाळिंबकर, बळवंत घुमरे, मधुरा चंदन, विवेक दांडेकर, लाईट ऑफ लाईफच्या कांचन थोरवे यांच्यासह अबालवृद्धांनी डीजेच्या तालावर वॉर्म अप केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून विविध गटांच्या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय खेळाडू जगदीश मरागजे, अमित विचारे, शरद जाधव, समीर येरणकर, स्वप्नील नामदास, समीर शिंदे, दिनेश भुसारी, संदेश देशमुख, दीपक चौरे, आशिष गायकवाड, मयूर जाधव, पियुष पवार, सुजक शिंदे, रितेश गायकवाड, जय गायकवाड, कुणाल जाधव, प्रतीक जाधव, महेंद्र बडेकर, विनोद बडेकर, अमोल जाधव, अनिल सावंत यांनी काम केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रदीप गोगटे यांनी करून स्पर्धेत रंगत आणली.

विजेत्यांची नावे लहान गट 8 ते 14 वर्ष मुलेः प्रथम जय हातनोलकर द्वितीय पोरोमित खरात, तृतीय ओम मराडे. लहान गट8 ते 14 वर्ष मुलेमुली: प्रथम सानिया खाडे, द्वितीय आर्या शिंदे, तृतीय -हर्षदा चव्हाण. खुला गट पुरुष: प्रथम- मंगेश पारधी, द्वितीय- केतन पारधी, तृतीय- अभिषेक रोजवर. खुला गट महिला गट: प्रथम रोहिणी मोडक, द्वितीय- कोमल पवार, तृतीय-धनश्री जोशी. ज्येष्ठ नागरिक: 50 वर्षापुढील प्रथम- हरिश्‍चंद्र ढोले, द्वितीय- बळीराम भालेकर, तृतीय- मनोहर दरवडा.

Exit mobile version