| कर्जत | प्रतिनिधी |
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि ऑलकार्गो लॉजिस्टिकच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील 29 गावातील 600 शेतकऱ्यांना 30000 फळझाडे विनामूल्य वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 50 फळझाडे वाटप करण्यात आले. या फळझाडांच्या मध्ये आंबे, काजू, साग, जांभूळ, लिंबू, पेरू, सीताफळ आणि फणस अशा फळ झाडाचा समावेश होता.
ही फळ झाडे सामुहिकरीत्या वाटप करण्यासाठी कर्जत तालुक्यातील भागुचीवाडी या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लाईट ऑफ लाईट ट्रस्टचे गौतम कनोजे (मुख्य व्यवस्थापक जागृती प्रकल्प) उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यावरण संवर्धन टीमचे एग्रीकल्चर ऑफिसर कन्हैया सोमणे, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरज अगविले, नितेश मोरे, संतोष शीद, अशोक भगत यांनी अथक परिश्रम घेतले.