| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुकास्तरीय कृषी मेळावा भात संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कर्जत तालुक्यात निर्माण झालेल्या भाताच्या वाणांची चर्चा पाहायला मिळाली.
रायगड जिल्हा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कर्जत तालुक्यामध्ये तालुकास्तरीय कृषी मेळावा रायगड जिल्हा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. तालुकास्तरीय कृषी मेळावा भात संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिता घारे यांच्या हस्ते झाले. यावेळी उप सभापती चित्रा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता मोरे, उषा ठोंबरे, कर्जत पंचायत समिती सदस्य नमिता श्रीखंडे, सुषमा पवाळी, नितिन धुळे, महेश खारीक, अक्षय तीटकारे तसेच जिल्हा कृषी आधिकारी आकाश चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते. या कृषी मेळाव्यात प्रगतशील शेतकऱ्यांचे सन्मान करण्यात आले. यावेळी प्रादेशिक कृषी शिक्षणाधिकारी रवींद्र मर्दाने यांनी आपल्या भागात घेतले जाणारे भातांची पिके तसेच कर्जत तालुक्यातील बियाणे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील भात बियाणे प्रत्यक्ष पाहणीसाठी ठेवले होते. पिकांची सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांनी बियाण्यांचा वापर कशा प्रकारे करावा, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कृषी मेळाव्यात भाताच्या वाणाची चर्चा
