जिल्ह्यातील पहिली शिक्षक क्रीडा स्पर्धा
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन करणारे शिक्षक आज चक्क मैदानावर खेळांमध्ये रमले. रायगड जिल्ह्यातील पहिल्या तालुकास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तब्बल 330 शिक्षक हे मैदानी खेळांमध्ये सहभागी झाले.
कर्जत तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचेवतीने तालुक्यातील 280 जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण देणारे शिक्षक यांच्यासाठी शिक्षक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कर्जत तालुका पंचायत समितीने एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला असून तालुका शिक्षक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नेरळ जवळील वंजारपाडा येथील माथेरान व्हॅली स्कूल येथे आयोजित स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सुनील भोपळे यांचे हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
कर्जत तालुका शिक्षक क्रीडा स्पर्धेची संकल्पना मांडणारे कर्जत तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड, तसेच शिक्षण विभागाचे बीट विस्तार अधिकारी अरुण पारधी, देविदास जाधव, तालुका समन्वयक किशोर पाटील, समीर येरुणकर, पेण शिक्षक पतपेढी अध्यक्ष गजानन घरत, उपाध्यक्ष मोहन पाटील, केंद्रप्रमुख गंगावणे, संदीप पाटील, केंद्र प्रमुख खाडे, सोनावळे रवींद्र भोईर, माथेरान व्हॅली स्कूलच्या मुख्याध्यापक मृदुला पटेल, शिक्षक समिती जिल्हा उपाध्यक्ष तानाजी गवारी, तालुका अध्यक्ष शैलेश जामघरे, जुनी पेन्शन संघटना जिल्हा अध्यक्ष मंदार रसाळ, शिक्षक भारती तालुका अध्यक्ष दिनेश घुडे, उर्दू संघटना लोगडे, आदी देखील उपस्थित होते.
या शिक्षक क्रीडा स्पर्धेसाठी परीक्षक भाकरीपाडा शाळेचे शिक्षक यशवंत वाघरे तसेच राष्ट्रीय पंच नेरळ विद्या मंदिरचे जयवंत पारधी, एल ए ई एस स्वप्नील नामदास, विशाल राठोड, नेरळ विद्या विकासचे नितीन सुपे यांनी काम पाहिले.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभाग शिक्षण अधिकारी सुनील भोपळे यांनी यावेळी शिक्षक खेळाडू यांना मार्गदर्शन करताना या ठिकाणी आल्यावर चांगला क्रीडा स्पर्धा शिक्षकांसाठी होणारी ही स्पर्धा होत आहे. जिल्ह्यात अशी स्पर्धा कधीही झालेली नाही मात्र पुढील वर्षापासून रायगड जिल्ह्यात अशा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड हेदेखील शिक्षक वर्गाबद्दल सहनभुती असलेले सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद असा निर्णय घेण्याचा प्रयत्न होईल असा विश्वास यावेळीव्यक्त केला.