पॉवर लिफ्टिंगमध्ये कर्जतच्या अमृताला कांस्यपदक

| नेरळ | प्रतिनिधी |

राष्ट्रीय सब ज्युनियर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कर्जत तालुक्यातील शेलू येथील रहिवासी आणि नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू अमृता ज्ञानेश्वर भगत हिने राष्ट्रीय पातळीवर कामगिरी केली आहे. तामिळनाडू राज्यात खेळविल्या गेलेल्या स्पर्धेत अमृताने राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकावर आपल नाव कोरले असून, तिची ही या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी आहे.

तामिळनाडू राज्यातील कुट्रालम येथे राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर (मुले/मुली) इक्वीप पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धा 12 ते 17 मे या कालावधीत झाली. या स्पर्धेत ज्युनियर 47 किलो वजनी गटात अमृता भगत हिने महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग संघातर्फे भाग घेऊन कांस्यपदक प्राप्त केले आहे. तिने एकूण 292.5 किलो वजन उचलेले. तसेच 84 किलो वजनी गटात खोपोलीची प्रणाली आनंद माने (केएमसी, कॉलेज) ही सहभागी झाली होती. तिने 250 किलो वजन उचलून पाचवा क्रमांक प्राप्त केला.

रायगडच्या खेळाडूंचे कामगिरीबाबत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिर असोसिएशनचे सेक्रेटरी, आंतरराष्ट्रीय पंच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत अमृता भगत हिला रायगडचे खेळाडू विक्रांत गायकवाड, सूरज घिमल आणि प्रणाली माने यांचे सहकार्य लाभले असून, आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमृता उतरणार असून, रायगड पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष गिरीश वेदक, सचिव अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, खजिनदार राहुल गजमल, सुभाष टेंबे, माधव पंडित, संदीप पाटकर, दत्तात्रय मोरे, श्रीनिवास भाटे, मानस कुंटे आणि विश्वनाथ माने या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.

Exit mobile version