कर्मयोगी शास्त्रज्ञाचा सत्कार

। मुंबई । प्रतिनिधी ।

रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी), मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज भालचंद्र उर्फ जे.बी. जोशी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा हृद्य सत्कार समारंभ रविवारी (दि.2) मुंबई येथे संपन्न झाला.

प्रा.एम.एम.शर्मा, डॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. अनिल काकोडकर हे तिन्ही पद्मविभूषण प्राप्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. जोशी यांच्या मसूर (जि.सातारा) गावाच्या शाळेतील शिक्षक ज्ञानेश्‍वर भोज (92) आणि शिक्षिका प्रतिभा ताम्हणकर (84) या समारंभास आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.जे.बी. जोशी यांनी आपले विचार मांडत आपल्या संशोधन कार्याचा आढावा तर मांडलाच पण आगामी काळात हाती घेण्यात येणार्‍या कार्याचे सुतोवाचही केले. अ.पां.देशपांडे यांनी आभार प्रदर्शन करताना प्रा. जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष या नात्याने गेल्या दहावार्षातील त्यांच्या योगदानाचा समर्पक आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांचाच एक विद्यार्थी डॉ. हेमंत जोगळेकर यांनी केले.

Exit mobile version