कर्नाळा-फळशेत रस्त्याच्या कामाला सुरुवात

। तळा । प्रतिनिधी ।

तळा तालुक्यातील कर्नाळा-फळशेत गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. तळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर कर्नाळा-फळशेत गावासाठी तळा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण झाले. पुर्वी माणगाव तालुका होता. त्या दृष्टीने निगुडशेत मार्गे तालुक्याच्या माणगाव या ठिकाणी जाणे सोपे होते. मात्र तळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर हा रस्ता येथील नागरिकांना दूरवरचा झाला. मात्र कर्नाळा-फळशेत हा रस्ता जवळचा व सोईचा होत आहे.

रस्त्याअभावी तळा ते आनंदवाडी व तेथून पुढे या गावांतील नागरिकांना या डोंगराळ भागातून चालत जावे लागत होते. तसेच याच मार्गांनी या गावांतील विद्यार्थी आठवी ते पुढील शिक्षणासाठी नियमित प्रवास करत होत. मात्र या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना आधार झाला आहे. आता अनेक समस्या या रस्त्यामुळे नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सुटणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Exit mobile version