| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील ओमकार क्रीडा मंडळाच्यावतीने कै. पूर्वा भगत स्मृती चषक, महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कै. पूर्वा भगत हीने ओमकार वेश्वी महिला कबड्डी संघात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. जिल्ह्यातील महिला चढाई पट्टूंना तिचा दरारा कायम राहिला. त्यामुळे तिच्या स्मरणार्थ या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेचे उद्घाटन कै. पूर्वा भगत हिचे वडील राजेंद्र भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, उपाध्यक्ष जितेंद्र शेळके, सचिव गिरीश शेळके व ओमकार क्रीडा मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेत पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स संघाने अंतिम सामन्यात पनवेल स्पोर्ट्स संघावर 4 गुणांनी मात करीत अंतिम विजय पटकवला. तर, किहिमचा भिल्लेश्वर संघ तृतीय आणि पेणचा ऋतिक्षा स्पोर्ट्स संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच, कर्नाळा स्पोर्ट्सच्या तेजा सकपाळ हिने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा मान पटकवला. तर, उत्कृष्ठ चढाई भिल्लेश्वरच्या चैत्राली म्हात्रे, उत्कृष्ठ पकड पनवेल स्पोर्ट्सच्या पायल निगडे आणि पब्लिक हिरो म्हणून ऋतिक्षा संघाच्या मलिका शिंदे यांना गौरविण्यात आले. वेश्वीच्या उपसरपंच आरती पाटील, जुई शेळके, रुपाली गुरव, प्राची राऊळ, सुप्रिया राऊळ, मनाली राऊळ, रोहिणी राऊळ, अंकिता शेळके, संजीवनी गोळे, रीमा ठाकूर, विदुला ठाकूर, नम्रता शेळके यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.





