काश्मिरी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन

पाकिस्ताने केला राष्ट्रीय दुखवटा जाहिर; इम्रान खानचे वादग्रस्त व्टिट
। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
काश्मिरी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन झाले असून यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वादग्रस्त व्टिट प्रसिद्ध केले आहे. या व्टिटमध्ये गिलानी हे पाकिस्तानी होते, असा उल्लेख करत त्यांच्या मृत्यनंतर एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाचे म्हटले आहे. याशिवाय गिलानी यांचा उल्लेख स्वातंत्र्य सैनिक म्हणून करत त्यांनी आयुष्यभर आपल्या लोकांना स्वत:च्या निर्णयाच्या हक्कासाठी लढण्यास शिकवलं. भारताने त्यांना कैदेत ठेवलं, त्यांच्यावर अत्याचार केले. आम्ही पाकिस्तानमध्ये त्यांच्या संघर्षाला सलाम करतो, असे इम्रान यांनी म्हटले आहे.

भारताचा केंद्रशासित प्रदेश असणार्‍या जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानला समर्थन करणारे काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आणि तीनवेळा आमदार राहिलेले सय्यद अली शाह गिलानी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. हैदरपोरा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते 92 वर्षांचे होते.

गिलानी यांनी तहरीक-ए-हुर्रियतची स्थापना केली. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी गटाचे नेतृत्व करणार्‍या ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्सचं अध्यक्षपद भूषवले आहे. गिलानी हे 1972, 1977 आणि 1987 मध्ये जम्मू-काश्मीरमधील सोपोरचे आमदार राहिले आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रकृतीच्या कारणांमुळे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यांच्या निधनानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी त्यांना काश्मीरच्या आदोलनाचे मार्गदर्शक म्हणून संबोधत गिलानी अंतिम श्‍वासापर्यंत लढत राहिल्याचे कुरैशी यांनी म्हटले आहे.

गिलानी यांच्या निधनानंतर पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी शोक व्यक्त केलाय. त्यांनी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणारे गिलानी हे प्रमुख नेते होते असे सांगतानाच त्यांनी भारतावरही गिलानी यांना त्रास देण्याचा आरोप केलाय.

Exit mobile version