कौलोशी ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत; प्रशासनाचे दुर्लक्ष

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील कौलोशी आदिवासीवाडीला जाणारा हक्काचा रस्ताच नाही. जो रस्ता आहे तो अक्षरशः पाय वाट आहे. शेताच्या बांधावरुन व  पायवाटेवरुन मार्ग काढावे लागत आहेत. आजही कौलोशी ग्रामस्थ हक्काच्या रस्त्यासाठी प्रतिक्षेत आहेत.

कौलोशी आदिवासीवाडी ही अंदाजे 30 ते 35 घरांची वस्ती साधारण 50 ते 80 लोकसंख्या आसलेला गाव. पण, आजतागायत या गावाला स्वतःचा व हक्काचा रस्ता होता तो रस्ता दुसर्‍याच्या जागेत निघाल्याने कौलोशीकर रस्त्यापासून वंचित झाले आहेत. हक्काचा रस्ता नसल्याने ग्रामस्थांसह रूग्ण, विद्यार्थी, शेतकरीवर्गाचे हाल होत आहेत.

या आदिवासीवाडीला हक्काचा रस्ता मिळावे अनेक वर्षापासून मागणी करत आहे. त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. आम्हाला हक्काचा रस्ता मिळावा, अशी मागणी कौलोशी आदिवासीवाडीतील ग्रामस्थ करीत आहेत.    

Exit mobile version