। पेण । वार्ताहार ।
महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशव (नाना) महादेव पाटील यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले असून मा.मंत्री कै.मोहन पाटील यांचे धाकटे बंधू तथा मा .आमदार धैर्यशील पाटील यांचे काका होते. गेले कित्येक वर्ष पेण येथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कार वाकु्रळ येथील स्मशान भूमीत झाले. अंत्यंसंस्कारासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.