। पाली/बेणसे । वार्ताहर ।
मुस्लिम समाज बांधवांचा अत्यंत पवित्र समजला जाणार्या रमजान ईद सणात लहान मुले रोजा (उपवास) धरतात. व ते महिनाभर रमजान पूर्ण करतात. रमजान ईद निमित्त बेणसे मोहल्ला येथील खादीजा सद्दाम मोमीन या 6 वर्षीय मुलीने पहिला संपूर्ण महिना रमजान पूर्ण केला आहे. समाजातील दुर्बल गोरगरीब घटक अन्न पाण्यावाचुन भुकेलेले व तहानलेले राहतात. उपाशी पोटी त्यांची अवस्था किती दयनीय होते. उपाशी राहिल्यावर जी मनस्थिती होते त्याची जाणीव व्हावी व त्यातून परोपकारी मानवतावादी दृष्टिकोन वाढीस येऊन आपल्याकडून देखील दान धर्म केला जावा. भुकेलेल्या व तहानलेल्या जीवाला आपण भोजन द्यावे हा देखील उद्देश रमजान धरण्यामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.