। नेरळ । प्रतिनिधी ।
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जत केंद्राच्या माध्यमातून जेंडर सेन्स्टायजेशन प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी समाजात चांगले कार्य करणार्या व्यक्तींना सुधारक सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी साधन व्यक्ती शेखर चोरगे यांनी पुरुषांना अनेक मुद्यावर प्रशिक्षण दिले. भेदभाव, रंगावरून, पेहरावरून, कामावरून अशा अनेक विषयांवर माहिती दिली. महिलांवर मानसिक व शारीरिक हिंसाचार ते कसे होतात आणि ते कसे थांबवता येतात, याविषयी उत्तम उदाहरणे देण्यात आली. सावित्रीबाई फुले यांना जशी संसारात आणि शिक्षणात ज्योतिबा फुले यांनी मदत केली. स्त्री पुरुष समानतेचा दर्जा कशा पद्धतीने दिला जावा. स्त्रियांवर होणारे अत्याचार कुठेतरी थांबल्या पाहिजेत. अशा अनेक विषयावर महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रगती लोकसंचलीत साधन केंद्रचे अध्यक्ष डॉ. हेमलता चिंबुळकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्या अमिता गायकवाड, जयश्री पिंजन, रीजवाना प्रधान, किसान क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत राणे, विनायक देशमुख तसेच जेंडर प्रशिक्षक शेखर चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.