खैराच्या लाकडांसह टेम्पो जप्त
| महाड | प्रतिनिधी |
महाड-पंढरपूर रस्त्यावर अवैध खैराची वाहतूक करणाऱ्या वाहनासह चालकाला पकडण्यात आले आहे. वनखात्याने केलेल्या कारवाई खैराची अवैध वाहतूक उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई व राष्ट्रीय महामार्गावरील राजेवाडी गावाजवळील उड्डाण पुलाजवळ वनखात्याचे कर्मचारी गस्त करीत असताना पिकअप संशयास्पद आढळल्याने तिची तपासणी केली असता खैराचे सोलिव नग 9 घनमीटर 0.0069 व गाडीच्या हौदामध्ये खैर लाकूड मिळाले. या खैराच्या मालाची वाहतूक केल्याबाबत संदीप उत्तम माने, वाहन चालक-मालक, रा. कारेगव्हाण, ता. बीड, जि. बीड या आरोपीस अटक केली आहे. दरम्यान, वाहनासह अंदाजे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत उपवनसंरक्षक रोहा व सहाय्यक वन संरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाने वनक्षेत्रपाल महाड व वनपरिक्षेत्राधिकारी आशिष पाटील यांनी पुढील कारवाई केली. याबाबतचा तपास चालू केला असल्याचे सांगितले.







