खांबिवली स्वप्नातील गाव म्हणून प्रमाणित

| तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील खांबिवली गावाला स्वप्नातील गाव म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. हे गाव 25 कुटुंबाची वस्ती असलेले छोटेसे गाव आहे. गाव विकास समिती व ग्रामस्थ यांनी गाव विकास व स्वप्नातील गाव करण्याच्या हेतूने गुण्यागोविंदाने एकत्र येऊन 2019 पासून प्रयत्न चालू केले. स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व मंडळी एकत्रित येऊन स्वच्छ, सुंदर, आरोग्य, आत्मनिर्भर या मुख्य घटकांचा विचार करून गाव विकास आराखडा बनवला व ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करत आज अंतिम टप्प्यावर पोहोचले आहेत.

स्वदेस फाउंडेशन मार्फत गावाला स्वप्नातील गाव नामफलकाचे अनावरण व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राकेश वडके,प्रसाद पाटील, वैभव पवार, रविंन्द्र राऊत, अनंत कांबळे, निकिता गायकवाड, छाया कजबले, ग्रामसेवक ,तलाठी तसेच गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने गाव विकास समितीच्या कामाचे सादरीकरण व्हिडिओद्वारे करण्यात आले. शासन व स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात विकासकामे कशी झाली याबाबत गाव विकास समितीने माहिती सादर केली. आतापर्यत गावातील एक शेतकरी आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित आहेत. आर्थिक साक्षरता प्रशिक्षणातून गाव विकास समितीने बॅकेंत बचत खाते काढले आहेत. गावामध्ये आधार कार्ड, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, शोषखड्डे, फळबाग लागवड, रेशन कार्ड, कचरा व्यवस्थापन, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना या गोष्टी गाव विकास समितीच्या माध्यमातून झाल्या आहेत.

Exit mobile version