शेकाप कार्यकर्ते खंडू वेळे यांचे निधन

। अलिबाग । वार्ताहर ।
सोमवारी दि. 27 रोजी खंडाळा गावातील रहिवासी माजी पोलिस, शेकाप कार्यकर्ते कै. खंडू मसणाजी वेळे यांचे सायंकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचे वय हे 63 होेते. तसेच त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा,सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर रात्री 10.30 वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी खंडाळा ग्रामपंचायत सदस्य अशोक थळे, सुरेंद्र वेळे, प्रभाकर वेळे, काशिनाथ थळे, विठोबा थळे, तंटामुक्ती अध्यक्ष बबन पाटील, नामदेव पाटील तसेच वेळे व थळे परिवार आणि खंडाळा ग्रामपंचायत विभागातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version