खो-खोत नांदगाव विद्यालयाचे वर्चस्व

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

रायगड जिल्हा क्रीडा परिषद अलिबाग यांच्यावतीने 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुधागड तालुकास्तरीय पावसाळी खो-खो क्रीडा स्पर्धा जांभुळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे जांभूळपाडा विद्यामंदिराचे प्राचार्य, शिक्षक वृंद यांनी उत्तम नियोजन केले होते. या स्पर्धेसाठी तालुक्यातील विद्यालयांतील विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मुले आणि मुली 14 वर्षे व 17 वर्षे वयोगटात संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव हे संघ अंतिम विजयी ठरले. या विजयी संघातील खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे तसेच प्राचार्य संभाजी ढोपे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version