अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा अटकेत

| पनवेल | वार्ताहर |

एका अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या एका इसमास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उभेद कादरी असे या तरुणाचे नाव असून त्याने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस कॉलेज फाटा करंजाडे येथून पळवून नेले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली  होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन वायकर व त्यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.

Exit mobile version