| पनवेल | वार्ताहर |
वनिता कातकरी (17) या अल्पवयीन तरुणीला कुणीतरी अज्ञात इसमाने कशाची तरी भुरळ घालून कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची घटना घडली आहे. वनिताची उंची 4 फुट 5 इंच, बांधा मध्यम, डोळे काळे, नाक सरळ, केस काळे मध्यम असून अंगात पांढऱ्या रंगाची थ्री फोल्ड पॅन्ट व काळ्या रंगाची टी-शर्ट तसेच पायात चॉकलेटी रंगाची चप्पल घातलेली आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे 27452333 किंवा सपोनि राजरत्न खैरणार यांच्याशी संपर्क साधावा.
अल्पवयीन तरुणीचे अपहरण
