माणघरमध्ये बैलांची हत्या

Yellow crime scene do not cross barrier tape in front of defocused background. Horizontal composition with selective focus and copy space.

पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील पुष्पकनगर-माणघर सेक्टर 7 येथे दोन बैलांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुष्पक नगर-माणघर सेक्टर 7 येथे येथे एका एर्टिगा कार मधून आलेल्या चार ते पाच इस्मानी बैलांची हत्या केली. व त्यांचे मांस घेऊन ते पळून गेले. या प्रकाराची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशाप्रकारे दिवसाढवळ्या बैलांची हत्या करून त्यांचे मांस पळवून नेणार्‍या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Exit mobile version