नेरळ-कळंब रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

। नेरळ । वार्ताहर ।

कायम वर्दळ असलेला नेरळ-कळंब या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तर, निर्माण नगरीजवळ मोरीवर मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

नेरळ-कळंब हा राज्यमार्गावर वाहनचालकांची कायम वर्दळ असते. तर, या मार्गावरील नेरळ ते साईमंदिर हा रस्ता नागरी भागात असल्याने वाहनचालकांसह पादचार्‍यांचीसुध्दा वर्दळ येथे सुरु असते. निर्माण नगरीपासून पाडा गेट हा डांबरी रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवण्याचा नादात वाहनचालकांचे अपघात होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. तर, याच मार्गावर पुढे निर्माण नगरीजवळ मोरीला मोठे भगदाड पडले असल्याने हा रस्ताच वाहून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी. हे खड्डे बुजवून मोरीचीदेखील दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version