किरण इनामदार याना अटक

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील पोस्ट शेअर केल्याप्रकरणी पनवेल येथील किरण इनामदार (37)याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 18 मे रोजी पळस्पे येथून किरण इनामदार याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी चितळेने शरद पवार यांच्या बदनामीकारक केलेल्या पोस्टला शेअर केलेल्या किरण इनामदार याच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर खासगी गाडीत आणल्याने साडी व बांगड्या देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा महिलांचा प्रयत्न फसला. मागील पाच दिवसापासून किरण इनामदार हा फरार होता, मात्र त्याला पनवेल पोलिसांनी अटक केली आहे.

Exit mobile version