कोको गॉफची आगेकूच

। लंडन । वृत्तसंस्था ।

अमेरिकेची दुसर्‍या मानांकित कोको गॉफने आपली लय कायम राखताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत धडक मारली. यासह महिला एकेरीत ओन्स जाबेउर व अग्रमानांकित इगा श्‍वीऑटेकनेही पुढची फेरी गाठली. पुरुष एकेरीत स्टेफानोस त्सित्सिपास, कार्लोस अल्कराझ, मेदवेदेवने पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले.

महिला एकेरीत गॉफने आपल्या दुसर्‍या सामन्यात रोमानियाच्या एन्का टोडोनीला पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गॉफने टोडोनीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. पोलंडच्या श्‍वीऑटेकनेही अमेरिकेच्या सोफिआ केनिनला नमवत आगेकूच केली. ट्युनिशियाच्या जाबेउरने जपानच्या मोयुका उचिजिमावर विजय नोंदवला. पुरुष एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या तिसर्‍या मानांकित कार्लोस अल्कराझने ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सांदर वुकिचला नमवले. तर, डॅनिल मेदवेदेवने फ्रान्सच्या अ‍ॅलेक्झाडर म्युलेरवर विजय मिळवला.

Exit mobile version