पारगाव ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
| पनवेल | वार्ताहर |
कोल्ही गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, अशी मागणी पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तसेच गट विकास अधिकाऱ्यांकडे दिले आहे.
पारगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत कोल्ही हे गाव अंतरराष्ट्रीय विमानतळ सोडत असल्यामुळे त्याचे पुर्नवसन झाले आहे. सदरचे पुर्नवसन वडघर हद्दीतीन झाले असल्याने सदरचे कोल्ही गाव हे स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून घोषित करावे, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांच्यासह कोल्ही गावातील पंच कमिटी अमृत भोईर, नारायण भोईर, संतोष राजेंद्र भोईर, प्रवीण भोईर, सुधीर नाईक, चंद्रकांत भोईर, संतोष शंकर नाईक, साहिल नाईक, हितेश नाईक, राजेश भोईर आदी उपस्थित होते
