| रोहा | वार्ताहर |
रायगड-रत्नागिरीदरम्यान दिवाण खवटी स्टेशनजवळ बोगद्यात ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मत्स्यगंधा एक्स्प्रेस रोहा स्थानकात थांबविण्यात आली आहे. मंगळवारी रात्री साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. रात्री उशिरापर्यंत ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. दोनच दिवसांपूर्वी रत्नागिरी ते राजापूरदरम्यान वेरवली मांडवकरवाडी येथे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील दिल्लीच्या दिशेने धावणार्या राजधानी एक्स्प्रेससह अकरा गाड्यांचा खोळंबा झाला होता.