| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोकण मतदार संघासाठी एकूण 98 मतदान केंद्रे होती. आतापर्यंत मतपेट्या उघडण्याच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.
तिसऱ्या फेरीत मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत. मतमोजणी साठी 2 हॉल असून एकूण 28 टेबल आहेत. 25 मतपत्रिकाचे एक गठ्ठा असे सर्व मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करून त्याची एका हौदात सरमिसळ करण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत सर्व 98 मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत. प्रत्येक टेबलवर 1250 मतपत्रिका देण्यात येतील, त्यानंतर वैध व अवैध मतांची मोजणी होईल.
