कोतवालवाडी ट्रस्टकडून फिरता दवाखाना सुरू

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील आरडे येथे असलेल्या गोरक्षनाथ मठ परिसरासाठी कोतवाल वाडी ट्रस्टकडून फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. अशी सेवा सुरू झाल्याने येथील स्थानिक रहिवासी यांच्या आरोग्याची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

कर्जत तालुक्यातील बहुतांश भाग शहरापासून दूर असल्याने त्यांना वैद्यकीय सेवा पोहोचवणे तसेच वैद्यकीय सेवेसाठी दूर प्रवास करून जावे लागत आहे. छोट्या मोठ्या आजारांसाठी जवळ उपचार मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यापासून उत्तम शेळके यांनी डॉ. संजय भामरे यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून 21 जुलै 2026 रोजी गोरक्षनाथ मठ आढें येथे लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, जे व्ही गोकल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व कोतवालवाडी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

आरोग्य शिबीरामध्ये रुग्णाला सर्व सेवा आणि औषधे मोफत आहेत. त्यामध्ये आरोग्य तपासणी (वजन, रक्तदाब व रक्त तपासणी), डायबेटीस (मधुमेह) तपासणी, ॲनेमिया तपासणी (शरीरातील रक्ताचे प्रमाण तपासणे), मोफत औषधे वाटप करण्यात आले.

यामध्ये 60 महिला व पुरुष यांनी पहिल्याच दिवशी फिरत्या दवाखान्याचा लाभ घेतला. आर्ढे, आसे, माले, फराट पाडा, पोंढ्याची वाडी, खडक वाडी, खरोड वाडी व परिसर यांना फिरत्या दवाखान्याचा लाभ मिळणार आहे. फिरत्या दवाखान्यासाठी एक मोठी ॲम्बुलन्स, त्यासोबत डॉक्टर संजय भामेरे, रोहित बांगारे, सुनिता आडे व वाहन चालक सागर यांच्या संपूर्ण टीमने नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवल्याने नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

Exit mobile version