कृष्णा लोखंडे यांचे निधन

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा नामदेव लोखंडे यांचे 15 ऑगस्ट रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 57 वर्षाचे होते. ते प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते. ते आपला वीटभट्टी व्यवसाय सांभाळून सामाजिक कामात सक्रिय होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सोशल डिस्टन्सचा पालन करीत उपस्थित होते. त्यांच्या आकस्मित निधनाने कोलाड परिसरासह आंबेवाडी गावावर शोककला पसरली आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि.24 ऑगस्ट रोजी तर उत्तर कार्य शुक्रवार दि. 27 ऑगस्ट रोजी त्यांच्या आंबेवाडी येथील निवासस्थानी होणार आहेत. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी एक मुलगा,एक मुलगी,दोन भाऊ, पुतणे, सुना, नातु व लोखंडे परिवार आहे.

Exit mobile version