सत्यवृत्त झोंबताच कृषीवलचे अंक जाळले
। अलिबाग । प्रतिनिधी ।
बंडखोर आमदारांच्या कारनाम्यांचे सत्यवृत्त कृषीवलमधून प्रसिद्ध होताच पिसाळलेल्या बगलबच्च्यांनी कृषीवलचे अंक अलिबाग, कुर्डूस येथे जाळले. यामुळे या बगलबच्च्यांच्याविरोधात सर्वसामान्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुुरुड तालुक्यातील कोर्लई येथे महेंद्र दळवी यांच्या वरदहस्ताने त्यांचे बगलबच्चे करीत असलेल्या अवैध कारभाराबाबत कृषीवलने वाच्चता फोडली. या वृत्त मालिकेचे सर्वस्तरातून स्वागतही करण्यात आले. मात्र हेच सत्यवृत्त झोंबल्याने आमदारांच्या बगलबच्च्यांनी थयथयाट करीत अलिबाग आणि कुर्डूस येथे कृषीवलचे अंक जाळण्याचा प्रकार केला.
राजा केणी, भरत बेलोसे, शुभांगी करडे, ऋषिकांत डोंगरीकर, रवि देशमुख जीवन पाटील, तुषार मानकवळे, सुरेश म्हात्रे, संकेत नाईक, थळे, अजय गायकर, अजित म्हात्रे, संकेत म्हात्रे, विकास निलकर, अक्षय पाटील, संकेत पाटील हे दळवींचे बगलबच्चे यावेळी सहभागी झाले होेते.
जनतेचा कृषीवलला पाठिंबा
बंडखोर आमदारांकडून होणार्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम कृषीवलने केले. त्यामुळे आगपाखड झालेल्या आमदारांच्या बगलबच्चांनी कृषीवल जाळून जनतेवर दबाव आणण्याचा पोकळ प्रयत्न केला. या घटनेबाबत कृषीवलने एक सर्व्हे केला. जनतेच्याच हाती निर्णय सोपविला. बंडखोरांच्या हुकूमशाहीचे समर्थन कि, कृषीवलला पाठिंबा याबाबत मत विचारले असता 99 टक्के नागरिकांनी कृषीवलला पाठिंबा देत आमदारांच्या बगलबच्चांना त्यांची जागा दाखवून दिली. जवळपास दोन तासांत 668 नागरिकांनी मत नोंदविले असून त्यामध्ये 664 जणांनी कृषीवलला पाठिंबा दिला.