। मुंबई । वृत्तसंस्था ।
94 व्या अकादमी पुरस्कारासाठी कूळंगल हा तमिळ चित्रपट भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. जवळपास 14 हिंदी, मराठी, मल्याळम, तमिळ, गुजराती चित्रपटांमधून दिग्दर्शक शाजी करूण यांच्या नेतृत्वाखालील समितीने कूळंगलची निवड केली आहे. कूळंगल हा दिग्दर्शक पीएस विनोथराज यांचा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाने याआधीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून नाव कमावले आहे.
फिल्म फे डरेशन ऑफ इंडियाने ऑस्कर पुरस्कारांसाठी 14 चित्रपटांची यादी केली होती. यात हिंदीतील विद्या बालनची भूमिका असलेला ङ्गशेरनीफ, शूजित सिरकार दिग्दर्शित सरदार उधमम यांच्यासह सिध्दार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेला शेरशहा, फरहान अख्तरचा तूफान आणि पंकज त्रिपाठींचा ङ्गकागझफ हे चित्रपटही स्पर्धेत होते. मराठीतील आता वेळ आली, कारखानीसांची वारी आणि गोदावरी हे तीन चित्रपट स्पर्धेत होते. सरदार उधममला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे आणि अमित मसूरकर दिग्दर्शित शेरनीच्या वेगळेपणामुळे या दोन चित्रपटांपैकी एकाची निवड केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र फिल्म फे डरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुप्रन सेन आणि शाजी करूण यांनी शनिवारी कूळंगल या चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून घोषणा केली.