कुलस्वामिनी उत्सव भक्तिभावाने साजरा

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील मुठवली खु. येथील तुपकर परिवाराचे सालाबादप्रमाणे याही वर्षी कुलस्वामिनी उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात श्री. सत्यनारायणाची महापूजा, सायं. पंचक्रोशीचे सामुदायिक हरिपाठ, रायगड भूषण ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे सुश्राव्य किर्तन, तद्नंतर महाप्रसाद व जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी तुपकर परिवारातील बाहेरगावी राहणारे परिवारातील सदस्य तसेच संपुर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती नोंदवून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा लाभ घेतला.

Exit mobile version