कामगार नेते रजनीकांत कुर्ले यांचे निधन

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील आंबेवाडी नाका येथील रहिवासी रजनीकांत कुर्ले यांचे शनिवारी (दि.28) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 62 वर्षाचे होते. ते भारत टेकसाईल कंपनीत ते नोकरी करीत होते. त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून धाटाव मधील बॉम्बे डाईंग कंपनी नोकरी केली.

लहानपणा पासुन त्यांना समाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची आवड होती. त्यांनी विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे कामे केली. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असुन त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, तीन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया सोमवारी (दि.6) तर उत्तरकार्य बुधवार (दि.8) त्यांच्या आंबेवाडी नाका येथील निवास्थानी होणार आहे.

Exit mobile version