| पेझारी | वार्ताहर |
पेझारी येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार निवासी शिबिर युवकांचा ध्यास : ग्राम शहर विकास या उदघोषणे अंतर्गत तीनविरा येथ आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन माजी जि.प.सदस्या, झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.चित्र पाटील यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा समन्वयक प्राध्यापक तुलसीदास मोकल यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले होते. दहा दिवस चाललेल्या या शिबिरात तीनविरा आदिवासी वाडीत स्वच्छता अभियान हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप प्रा.डॉ. भटू वाघ, जिविता पाटील, पूनम पाटील, मनिषा चव्हाण, कांचन मोहिरे, प्रा.अस्मिता पाटील, अॅड. गीता दर्शन म्हात्रे, वन अधिकारी सदाशिव मंटूर, प्रा.संतोष बिरारे, निर्मला फुलगावकर, नितीन राऊत, जोगळेकर मॅडम, मिठागरे, दिपाली मॅडम, कराटे प्रशिक्षक कल्पेश शिंदे, कृषीवलचेे मुख्य संपादक राजेंद्र साठे, प्रा. दिलीप सोनवणे आणि प्रा.अनिल बांगर, कैलास पिंगळे, प्राचार्य कमलाकर फडतरे आदीनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
शिबिराचा समारोप पंडितशेठ फाउंडेशनचे अध्यक्ष सवाई पाटील यांच्या विशेष उपस्थितीत झाला. यावेळी प्रा.डॉ. अतुल साळुंखे उपस्थित होते. याप्रसंगी शिबिरार्थी विद्यार्थिनी सुहानी पाटील, प्रतीक्षा पाटील, दिशा पाटील, भूमिका वाटमारे, सृष्टी म्हात्रे, जान्हवी पाटील आणि एनएसएस कॅम्प लीडर निशीता झेले यांनी मनोगते व्यक्त केली. शिबिर प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश बिर्हाडे यांनी शिबिराचा आढावा घेतला.
शिबिरात योग प्रशिक्षणासाठी पतंजली योगपीठ आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट हरिद्वार चे रायगड प्रभारी दिलीप गाटे, भरत कहाणे, गौतम लेऊआ यांचे सहकार्य लाभले तर तीनविरा येथील सरपंच, पोलीस पाटील, महिला मंडळ, गेस्ट हाऊसचे सर्व कर्मचारी, जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभाग, माजी सरपंच सौ.प्रीती पाटील आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, समीर पाटील, सारिका म्हात्रे, जयवंत वालेकर, ज्योत्स्ना पाटील, शोभा टेमकर, निलेश कुलाबकर आदींचे सहकार्य लाभले.