| उरण । वार्ताहर ।
चीनसह अन्य देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने जगभरामध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट झाले असून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून (23 डिसेंबर) मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात टाळेबंदी लागू केली जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे कोरोनाला अजिबात घाबरू नका, निधड्या छातीने सामोरे जा असे आवाहन उरण डॉक्टर वेलफेअर असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे केले आहे.
शासकीय पातळीवर कोरोना संदर्भात ज्या काही सूचना येतील त्याचे पालन करावे. त्यामध्ये प्रामुख्याने जनतेने आपली काळजी घेतली पाहिजे. तसेच परत एकदा सुरक्षित अंतर, मास्क, नियमित योगा व्यायाम कारणे, घरचे शिजवलेल अन्न खाणे, फळ हिरवा भाजीपला खाणे जेणेकरून आपली प्रतिकार शक्ती कशी वाढेल याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक बनले आहे. तसेच लसीकरण करुन घेणे, ज्यांनी बूस्टर डोज़ घेतले नाही त्यानी नक्की लावून घ्या, घाबरू नका, सतर्क रहाणे, काही त्रास असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.ज्याप्रमाणे आपण मागील दोन वर्षे ज्या हिंमतीने कोरोनाचा सामना केलात. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सज्ज राहिलो तर नक्कीच पुन्हा कोरोनावर मात करण्यात यशस्वी होऊ हा विश्वास ठेवून लढाईसाठी तयार रहा असे आवाहनही डॉ. ठाकरे यांनी केले आहे.