राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनात होणार सहभागी
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकावर राहिलेला कर्जत तालुक्यातील नेरळ येथील एलएईएस शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रतिकृती राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पोहोचली आहे.‘लडकी’ या नावाचे हे मॉडेल देशपातळीवर पोहोचले असून, राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात भोपाळ येथे या प्रतिकृती पोहोचली आहे.
भोपाळ येथे होणाऱ्या 52 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शन भरणार आहे. या विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्र राज्याकडून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ येथील एलएईएस शाळेचा उपक्रम पोहोचला आहे. एलएईएस शाळेच्या विद्यार्थ्यांचा ‘लडकी’ हा विज्ञान प्रकल्प आता राष्ट्रीयस्तरावर पोहोचला आहे. कर्जत तालुका विज्ञान प्रदर्शन 2024-25 अंतर्गत सादर झालेला हा प्रकल्प प्रथम तालुका, रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शनात प्रथम आणि राज्य स्तरावर यशस्वी ठरल्यानंतर एलएईएस शाळेची प्रतिकृती राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित 52 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शन 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी निवडला गेला आहे. राष्ट्रीय प्रदर्शन दि. 18 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान भोपाळ येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन येथे भरविले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व हे मॉडेल करणार असून, या मॉडेलची निर्मिती शाळेची विद्यार्थिनी कृषा गणेश सावंत सादरकर्ती असून, तिला विशाल राठोड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शाळेच्या समन्वयक गायत्री सावंत भोसले, तसेच शिक्षक संकेत, सूरज यांचेदेखील योगदान मिळत आहे. एलएईएस इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापक अजिता नायर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







